"जगण्याचा घाट"

खडतर हा जीवन प्रवास
तरी जगण्याचा घाट इथे...

गदारोळात संकटांच्या
पुढे दिसेनाशी वाट इथे...

दाटलेल्या भावनांचे
धुके किती घनदाट इथे...

दिवस कसासा टळून जातो
पण छळून जाते पहाट इथे...

शाप भोगते ऐश्वर्य मनाचे
अन दारिद्र्याचा थाट इथे...

सुकले डोळे आटले अश्रू
तरी ओलसर काठ इथे...

एक कोरडा समुद्र किनारा
एक तरसती लाट इथे...

खडतर हा जीवन प्रवास
तरी "जगण्याचा घाट" इथे......

- सं दि प

Comments