"मनमुराद जगणं"

स्वप्नांच्या रंगात बेधुंद ही दुनिया
स्वप्न रंगवणं हा गुन्हा नाही...

माणुसकीच्या छायेत तरलंय हे जग
माणसाने माणूस असणे हा गुन्हा नाही...

भ्याड समजतात लोकं, मृदू शब्दांना
जीभेचं अति गोड असणं हा गुन्हा नाही...

कधी कधी स्वतःचीच लागते नजर सुखांना
अपेक्षांचं सुंदर असणं हा गुन्हा नाही...

वापर करतात लोक मिठा सारखा
अश्रूं सुद्धा खारट असणं हा गुन्हा नाही...

कधी कधी वैरत्व येत अकारण अनेकांशी
इथे माणसाचा चांगुलपणा हा गुन्हा नाही...

मनमुराद घ्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंद
जगतोय जे सुंदर क्षण, हा जन्म पुन्हा नाही...

- डॉ. सं दि प

Comments

Popular Posts