"राख"


ना मुस्लिम नसल्याचं दुःख आहे,
ना हिंदू असल्याचं सुख आहे,
इथे चिंता सुद्धा सतत जाळतेय
ती रोजची पोटाची भूक आहे...

नको रे बनवू स्वतःला नराधम
तुझ्या आतला कलाम शोध
जाळायच तर जाळ तुझी वासना
अंतर्मनातला सलाम शोध...

आता सजा म्हणून तुझी जरी राख केली
धिंड काढून घातली चौकात गोळी
पण तुझ्या या बेशरम कृत्याने
निष्पाप जीवाची केली की रे राख रांगोळी...

नारीशक्ती चा मान सन्मान
हे आपल्या देशाचं नाक आहे,
आज तुझ्या हाताला लागलेली
ती माझ्या बहिणीची "राख" आहे...

- डॉ संदिप सोमेश्वर टोंगळे

Comments