"जीवनप्रवास"

हे माझ्या प्रिय आयुष्या...!
तू निरंतर हसवलंस
मी हसत आलो,
तू रडवलस सुद्धा
मी रडत आलो,
तुझ्या हातात
माझ्या आयुष्याची
दोरी पकडून
कंठपुतली सारखं
मला नाचवलंस
मी नाचत आलो...

तुझ्या रोजनिशीत
माझ्या भावनांची
होतेय आता दमछाक
असं किती दिवस
तुझ्या तालावर
मी नाचत राहू
ऐकशील का रे
माझ्या मनाची हाक
हवाय गर्दीतला एकांत
नकोय कसलीच भ्रांत
जगणं हवंय
थोडतरी शांत...

सतत सुरू असतो
डोक्यात आपल्या,
राहून गेलेल्या
गोष्टींचा पसारा,
अंतर्मनातल्या
छोट्याशा कप्प्यात
लपवून ठेवलेला
त्यागाचा पिटारा,
हा जीवनप्रवास
ऐकत नसेल का?
आयुष्य जगण्याचा
हा खटाटोप सारा

कोणालाच
माहिती नाही
कधी थांबेल
हा श्वास,
कधी सोडून
जावं लागेल
या सुंदर
आयुष्याची कास,
मनसोक्त जगण्याची
ओढ वाढते मनातली
अन काढून घेतोस तू
तोंडचा घास,
कसा आहे रे आयुष्या
तुझा हा जीवनप्रवास
कसा आहे रे आयुष्या
तुझा हा जीवनप्रवास...

- डॉ संदिप टोंगळे.

Comments

Popular Posts