“शौर्याची गाथा”

      अवघड झालीय स्थिती

      कोणी म्हणतय मिति

      तर कोणी सांगतंय तिथी

      नकोय आता त्या जाती पाती

      सांगतो लावून कपाळाला माती

      आमच्या मनात नेहमीच छत्रपती

      या महापुरुषांना आमच्या मनात पाहू द्या

      आम्हाला यांच्या “शौर्याची गाथा” गाऊ द्या



      तरुणाईचं एकच लक्ष

      कोण उमेदवार कोणता पक्ष

      राजकारणी राहतात दक्ष

      बिचारी जनताच होते भक्ष्य

      कोणी सोडायला तयार नाही आपला कक्ष

      कसा मिळेल या अराजकतेतून मोक्ष

      बाबासाहेबांच्या घटनेची नीट अंमलबजावणी होऊ द्या

      आम्हाला यांच्या “शौर्याची गाथा” गाऊ द्या



      आजचा दिवस रेटला

      कि संपते जबाबदारी आपली

      कोणी विचार नाही करत

      का ही भूमी तापली

      आपल्याच फायद्यासाठी

      आपण निसर्गाची मान कापली

      म्हणून वृक्षारोपणाची माळ

      अनेकांनी अनेक वर्ष जपली

      गाडगे बाबांसोबत आम्हाला पण हातात झाडू घेऊ द्या

      आम्हाला यांच्या “शौर्याची गाथा” गाऊ द्या



      महापुरुष सांगून सांगून थकले

      मुलींचं शिक्षण प्रगतीच लक्षण

      पण आपणच करतोय त्यांचं भक्षण

      काय उपयोग घेऊन उच्चशिक्षण

      करू शकत नाही आपण

      आपल्याच संस्कृतीच रक्षण

      जिजामाता अन सावित्रीबाईंच्या शिक्षणाची गंगा सर्वत्र वाहू द्या

      महात्मा फुलेंच्या विचारांची मेजवानी आम्हाला घेऊ द्या

      आम्हाला यांच्या “शौर्याची गाथा” गाऊ द्या

                                   

      - सं दी प

Comments

Popular Posts