काळजाचे टाके...

भिजलेल्या पापण्या
झीजलेल्या भावना
अंतःकरण पेटललं
वर्णिताना वेदना...

नसलेला आभास
वास्तवाशी सामना
विस्मरीत झालेल्या
मनातल्या कामना...

भरलेल्या हृदयात
दुःख आता मावेना
उसवलेलं काळीज
फाटलेलं सोसवेना...

काळजाचे टाके
उसवले पुन्हा
असे कसे टाके
घेतलेस रे मना...?

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments