"भूक"

लहानपणी ओळखायचो
आपण आपलं सुख
आता मोठं झालोय
तरी कळतं नाहीये
कशाची असेल ही भूक
पोटाची की स्वार्थाची
मनाची की शरीराची
इच्छेची की बदल्याची
इर्षेची की द्वेषाची

तडपत राहतो आपण
अख्ख आयुष्य
त्याचं न उमजलेल्या
भुकेच्या तडपेत
त्याच भुकेला
वेगवेगळी नाव देत
टाकतो आपण त्यावर
पांघरण समजूतदारीचं

आणि अंतरंगात
ठेवतो लपवून
आपला मूर्खपणा
जो ओळखू
नाही शकत
कशात असेल
आपलं खरं सुख,
जो शोधत राहतो
बाहेरच्या या
भौतिक जगात
आपली "भूक"...

- डॉ. संदिप टोंगळे

Comments

Popular Posts