"निसर्गा नमन तुला"

भयाण वारा बनून
मनामनात ठिणगीतून
वणवा पेटवणारा तूच,
त्याच वाऱ्याची
झुळूक बनून
आशेचा दिवा
विजवणारा ही तूच...

वादळी पाऊस बनून
कष्टाचं घर दार
उध्वस्त करणारा तूच,
त्याच पावसाच्या
इवल्याश्या थेंबाने
तहान भागवणारा ही तूच...

कडक ऊन बनून
अंगाची लाहीलाही
करणारा तूच,
त्याच तळपत्या उन्हाने
वृक्षांचं पोषण
करणारा ही तूच...

फुलपाखरू बनून
सृष्टीला सुंदर
बनविणारा तूच...
सरडा बनून
मनातले रंग
दाखवणारा ही तूच...

एक विषाणू बनून
जगणं कसं असावं?
हे शिकवणारा तूच,
त्याचं विषाणू ने
हेच सुंदर जगणं
हिरावणारा ही तूच...

तुझ्या या रुपांची
शिकवण कळू दे
आम्हा माणसाला,
खरंच निसर्गा नमन तुला
खरंच निसर्गा नमन तुला......

- डॉ संदिप टोंगळे

Comments

Popular Posts