खोटे मुखवटे

           वास्तविकतेकडे कानाडोळा करून आभासी दुनियेत रममाण राहायची आपल्या सर्वांना एक प्रकारची सवयच लागलीय. आपल्या मनातले खरे विचार, खऱ्या भावना लपवून आपण “खोटे मुखवटे” घालून मिरविण्याचा एवढा अट्टाहास का करतोय......? आपल्या उक्तीत, कृतीत आणि मतीत अकल्पित विरोधाभास का असतो......? इतकं खोट जगण कशासाठी.? फक्त जगाला दाखविण्यासाठीच ना…… खोट हसण, खोट रडण, खोटे हावभाव, खोटा आनंद, खोटा दिखावा, खोटे विचार हे आपण जगाला दाखवू शकतो पण एकांतात आपल्या खऱ्या मनाशी आपण संवाद केला तर हे खोटे मुखवटे आपोआप गळून पडतात. मग आपल्याच मनात स्वतःबद्दलची अस्मिता टिकून राहू शकेल का......? असं हे खोटेपणाने वागण आपल्या स्वतःच्या मनाला तरी पटेल का......? एकवेळ जगाशी राहू द्या पण आपण आपल्या स्वतःशी तरी प्रामाणिक आहोत का......? सहनशीलतेची ढाल हातात घेऊन, एक हसरा मुखवटा घालून स्वत:च्या सर्व सुख-दुखांना बगल देऊन, भाव-भावनांना एका कोपऱ्यात ठेवून आपण बाहेरच्या जगात आपले व्यवहार पूर्ण करण्याचा निरंतर प्रयत्न करत असतो. पण घरी आल्यावर मात्र एकांतात स्वतःशीच संवाद साधताना आपला खरा चेहरा दिसतोच...... आणि “खोटे मुखवटे” गळून पडतात.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts