"सर्च"

          कधी कधी आपल्याला एखादा प्रश्न सतावत असतो आणि त्याच उत्तर आपल्याला माहिती असतं पण पटकन लक्षात येत नाही, मग त्यावेळी आपण बुद्धीला जास्त ताण न देता लगेच तो प्रश्न आपण गूगल वर सर्च करून त्याचे उत्तर मिळवितो आणि अगदी क्षणार्धात आणि सहजरित्या आपल्याला ते उत्तर सुद्धा मिळते. दैनंदिन व्यवहारातल्या बऱ्याचश्या गोष्टी  आपण बुद्धीला ताण न देता लगेच गूगल वर सर्च करून मोकळे होतो ज्याचे उत्तर बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असते. आपल्याला गूगल वर प्रत्येक गोष्ट सर्च करण्याची जणू सवयच लागलेली आहे. याच प्रकारे आपण आपल्या मनातला हरवून बसलेला आनंद सुद्धा आपण बाहेरच्या भौतिक जगात सर्च करण्याचा असफल प्रयत्न करतोय जो आपल्यातच कुठे तरी दडून बसलाय. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण गूगल सारखंच आपल्याच अवतीभवतीच्या भौतिक गोष्टीत शोधत आहोत. पण खरंतर बाकीच्या प्रश्नासारखं याचं उत्तर सहज मिळत नसतं. त्यासाठी आपल्या स्वतःच्याच मनात "सर्च" करायला हवा. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा मनातून आनंद "सर्च" करण्याची सवय लागली की आयुष्य खूप सुंदर वाटू लागतं. बघूया "सर्च" करून......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts