वेदनांची वरात


सुख दुःख सोसताना इतकं कळून चुकलं
की दिलखुलास हसलो तर जगणं सुरात आहे
कळपात मत्सराविन, जगते जनावरेही
जे माणसात नाही ते दिसते गुरात आहे

वैफल्यग्रस्त असती, अतिदूर ध्येय ज्यांचे
क्षितिजास गाठणारा कोणी जगात आहे?
धन दांडग्यांची आलबेल ही दुनिया
फक्त पैशापुढे झुकणे, पडला प्रघात आहे

स्वार्थ साधण्यास लोक बनतात परोपकारी
गेली वाहून आस अश्रूंच्या पुरात आहे
भरडून कित्येक सल, चक्कीत जीवनाच्या
मेल्यावर सुद्धा जगण्याची उर्मी उरात आहे

सतशील सदगुणांना कसलाच भाव नाही
औकात दुर्गुणांची चढत्या दरात आहे
सरत्या आयुष्याकडे, बघता वळून मागे
माझ्याच वेदनांची पाहतो वरात आहे......

- डॉ संदिप टोंगळे
   एम. डी. मेडिसिन (आयु)
   माढा, सोलापूर

Comments

Popular Posts