"वेदना"

         मागे एकदा मी असाच क्लिनिक मध्ये बसलो होतो तेव्हा एक ओळखीचीच कैंसरग्रस्त महिला तिच्या 2 वर्षाच्या मुलीला तपासण्यासाठी घेऊन आली. मी बाळाला व्यवस्थीत तपासलं आणि रक्ताची तपासणी करण्यासाठी waiting रूम मधे बसवलं. थोड्यावेळाने waiting रूम मधून कसला तरी आवाज येतोय म्हणून मी पहायला गेलो तर माझी नजर waiting रूम मधे बसलेल्या त्या महिले कड़े गेली. ती महिला तिच्या बाळासोबत खेळत होती. बाळाचं बोलणं, चालणं, हालचाली यावर ती बेभान होऊन हसत होती, त्या बाळाची छोट्यात छोटी प्रत्येक गोष्ट ती आनंदाने सेलिब्रेट करत होती. ते पाहून माझ्या मनात विचार आला की ही महिला कैंसर ग्रस्त असून सुद्धा किती आनंदाने राहतेय, पुढे येईल तो क्षण मनसोक्त सेलिब्रेट करतेय. आणि आपण नसलेली दुःख कुरवाळत बसलोय, आयुष्याबद्दल तक्रारी करतोय. आपण सुद्धा असाच आनंद साजरा केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक विजयाचा. आपणही असच हसलं पाहिजे, नाचलं पाहिजे, हे सुंदर आयुष्य मनसोक्त जगलं पाहिजे आणि स्वताला म्हटलं पाहिजे कर मनाला वाट्टेल ते अन मनाला पटेल ते...... आपल्या मनातल्या "वेदना" सुद्धा सेलिब्रेट करता आल्या पाहिजेत, त्यालाच खरं आयुष्य जगणं म्हणतात.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts