चिखलात जगणं हरवलंय......

          म्हणतात ना आपल्या स्वतःचं घर हाच आपल्यासाठी खरा स्वर्ग असतो, केरळ च्या भयाण पुरात ज्यांची अख्खी घरच्या घर अक्षरशः वाहून गेली, नेस्तनाबूत झाली, जमिनदोस्त झाली असे आपलेच बंधू-भगिनी आज रस्त्यावर संसार मांडून बसलेत. त्यांची लहान मुलं, वयोवृद्ध आई-वडील, थकलेले आजी-आजोबा ही सगळी आपलीच मंडळी आज आपण रस्त्यावर आलेली पाहतोय. त्या चिमुकल्यांचं सजवलेलं आंगण हरवलंय...... त्या थकलेल्या जिवांचा आधार हरवलाय...... जिकडे डोळे फिरवले तिकडे फक्त चिखल चिखल आणि चिखलच दिसतोय. त्या चिखलात  जगणं हरवलंय आपल्या बांधवांचं......, ते बिचारे कसंतरी धडपडत आयुष्य जगत आहेत. नुसता विचार जरी केला तरी डोळ्यातून नकळत पाणी ओघळतंय...... तिथली वस्तुस्थिती पाहिली तर मन हेलावून जातंय. अशी भयाण वेळ कोणावर ही येऊ नये. पण निसर्गाच्या विध्वंसापुढे कोणाचे काय चालते......?

आपल्या याच बांधवांना आपण प्रत्येकाने जमेल तसा आणि जमेल तितका मदतीचा हात पुढे करायलाच हवा. मित्रांनो, हीच वेळ आहे, चला...... आपल्या मनातल्या सामाजिक बांधिलकीला साद देऊयात आणि केरळ पुरग्रस्तांच्या भयाण वेदनेला प्रतिसाद देऊयात.

आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की आपणास जमेल तशी आणि जमेल तितकी मदत कोणत्याही मार्गाने करा पण नक्की करा.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts