"गतकाळ"

माझ्या अंतरीचा गंध
कुठे दरवळून जातो,
माझ्या मनीचा पसारा
अलगद कळून जातो......

मी मुक्त असाच
मनमुराद फुलून जातो,
सांजवेळी रोजच
एकांत खुलून जातो......

जगण्याची ही रीत
शब्दात लिहून जातो,
शब्दांचा हा नशा
कवितेत पिऊन जातो......

अगतिक ही क्षणाची
काळ टळून जातो,
मजला कधी न कळले
रस्ता वळून जातो......

ऋण हे फेडण्यास
घास जळून जातो,
सजवलेल्या दुःखाचा
भास कळून जातो......

ईर्षा ही मनाची
बोध कळून जातो,
मजवरी जडलेला
क्रोध कळून जातो......

दरवळ या मनाचा
तनी रुजून जातो,
निष्पर्ण आयुष्याचा
चाफा गळून जातो......

पचवली कित्येक गरळ
हलाहल गिळून पाहतो,
श्वासात श्वास भरतो
अन मृत्यू टळून जातो......

माझ्या खेळ हा मनाचा
सारखा छळून जातो,
जीवनाच्या आरशात
"गतकाळ" वळून पाहतो......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts